Breaking
Updated: मे 19, 2026
पाथरी-माजलगाव महामार्गावर भीषण अपघात, दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव – परभणी जिल्ह्यातील पाथरी-माजलगाव महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पाथरी-माजलगाव राष्ट्रीय महामार्गावर ढालेगावजवळील रामपुरी खुर्द शिवारात ही घटना घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील रेनापुरी येथील 28 वर्षीय रवींद्र शिवाजी घडशिंगे व 22 वर्षीय विशाल शिवाजी घडशिंगे हे दोघे सख्खे भाऊ मानवत येथे नातलगांना भेटण्यासाठी गेले होते. नातलगांची भेट घेऊन ते आपल्या मोटारसायकलवरून (एमएच 44 एबी 2625) पाथरी मार्गे रेनापुरीकडे परतत होते. दरम्यान, ढालेगाव-पाथरी दरम्यान रामपुरी खुर्द शिवारात त्यांच्या दुचाकीला भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. मात्र, दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी मयतांचे वडील शिवाजी मळीबा घडशिंगे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फरार वाहनाचा शोध सुरू केला आहे.