Breaking

अंबाजोगाईत बंद घराचे कुलूप तोडून १ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Updated: मे 19, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत बंद घराचे कुलूप तोडून १ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: येथील आजीमाजी सैनिक कॉलनी, मोरेवाडी भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाकर रघुनाथ मुंडे (वय ४१, रा. आजीमाजी सैनिक कॉलनी, मोरेवाडी, अंबाजोगाई) हे नागपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सानिका मुंडे या अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात स्टाफ नर्स आहेत. मुलांच्या सुट्ट्यांमुळे त्यांची पत्नी १३ मे रोजी घराला कुलूप लावून नागपूर येथे गेल्या होत्या. त्यानंतर १८ मे रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास मुंडे कुटुंबीय नागपूरवरून परत आले. त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, जिन्याखालील व बेडरूममधील लोखंडी कपाटे उघडी आणि त्यातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

घराची पाहणी केली असता, चोरट्याने घराच्या टॉवरच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे समजले. कपाटातील ६० हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या आणि ४० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (मंगळसूत्र) असे एकूण १ लाख रुपयांचे दागिने गायब होते. या प्रकरणी प्रभाकर मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे पुढील तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts