Breaking
Updated: मे 20, 2026
तेलगाव बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सोन्याची अंगठी लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदिंद्रुड: तेलगाव बस स्थानक परिसरातून एका महिला प्रवाशाची सुमारे ३७ हजार ७९३ रुपये किमतीची सोन्याची अंगठी अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शारदा बालाजी गुट्टे (वय ३३, व्यवसाय- घरकाम, रा. मोंढा नाका, बालाजीनगर, संभाजीनगर) या प्रवास करत असताना तेलगाव बस स्थानकावर आल्या होत्या. सायंकाळी ५.०० ते ५.३० वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात आणि बसमध्ये चढत-उतरत असताना गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील ३.६९० मिलीग्राम (अंदाजे साडेतीन ग्रॅम) वजनाची सोन्याची अंगठी अत्यंत चालाखीने चोरून नेली. अंगठी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र चोरट्याचा कोणताही सुगावा लागला नाही.
त्यानंतर शारदा गुट्टे यांनी दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) नुसार चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार झाटे करत आहेत.