Breaking
Updated: एप्रिल 18, 2026
पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाचे डोके फोडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: नेकनूर तालुक्यातील साखरे बोरगाव येथे नातेवाइकाला उपचारासाठी दिलेले उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून एका ४४ वर्षीय व्यक्तीवर दगडाने हल्ला करून त्याचे डोके फोडल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीचे नातेवाईकही जखमी झाले आहेत.
याबाबत गोरखनाथ सुंदर काळे (वय ४४, रा. साखरे बोरगाव) यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १८ एप्रिल २०२६ रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आरोपी नाना चंदर पवार, विलास कल्याण पवार, सुरेश रामजी पवार आणि मोहन बँकड पवार यांनी गोरखनाथ यांना गाठले. ‘तुमची बहीण मला दिलेली आहे, तिच्या उपचारासाठी पैसे द्या’ असे म्हणत आरोपींनी वाद घातला.
जेव्हा गोरखनाथ यांनी नकार दिला, तेव्हा आरोपी नाना पवार याने त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले. इतर आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना काठ्यांनी बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. नेकनूर पोलिसांनी या चारही आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सांगाळे पुढील तपास करत आहेत.