Breaking

उसने घेतलेले पैसे मागितले म्हणून तरुणाला बेदम मारहाण; मारहाणीचा व्हिडिओ बनवून परिसरात दहशत

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

मारहाणीचा व्हिडिओ बनवून परिसरात दहशत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील आम्लेश्वर चौकात उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपीने या मारहाणीचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल केल्याने परिसरात दहशत पसरली आहे.

या प्रकरणी रामेश्वर तानेराव जाधव (वय २९, रा. काळवटी, ता. अंबाजोगाई) यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास आरोपी कृष्णा अंकुश जाधव आणि अभय विनायक जाधव यांनी रामेश्वरला एका शेतात गाठले. रामेश्वरने उसने घेतलेले पैसे परत मागितल्याने आरोपी कृष्णा याने त्याला शिवीगाळ करत काठीने पायावर, हातावर आणि डोक्यात बेदम मारहाण केली.

मारहाण सुरू असताना आरोपी अभय जाधव याने आपल्या मोबाईलमध्ये या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. या भीषण मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला आहे. अंबाजोगाई शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार गाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts