Breaking

कोर्टाच्या दाव्यावरून वाद; तरुणावर हल्ला करून मांडीचा घेतला चावा

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाचे डोके फोडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज: केज तालुक्यातील येवता येथे कोर्टातील जुन्या दाव्याच्या कारणावरून वाद होऊन एका ४० वर्षीय व्यक्तीला लाकडी फळीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मांडीचा चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे.

महेंद्र नवनाथ गायकवाड (वय ४०, रा. येवता) यांनी केज पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी राहुल सुंदर काळे, गब्बर बाळासाहेब काळे आणि नंदुबाई सुंदर काळे यांनी महेंद्र यांना गाठले. ‘तू आमच्या विरुद्ध कोर्टात केस का केलीस’ असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ सुरू केली.

आरोपी राहुल आणि गब्बर यांनी हातातील लाकडी फळीने महेंद्र यांच्या पाठीवर आणि पोटावर जोरात प्रहार केले. तसेच आरोपींनी महेंद्र यांच्या मांडीला जोरात चावा घेऊन त्यांना जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली. केज पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार हनवते पुढील तपास करत आहेत


Categories

Recent Posts