Breaking
Updated: एप्रिल 18, 2026
सलूनच्या दुकानात दारू पिण्यास मज्जाव; युवकाला बेदम मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथे ‘तुझ्या दुकानात मला दारू पिऊ दे’ असे म्हणणाऱ्या तरुणाला विरोध केल्यामुळे एका सलून चालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत सलून चालकाच्या हातावर वेळूच्या काठीने वार करून त्याला जखमी करण्यात आले आहे.
या प्रकरणी सुरज भगवान गवळी (वय ३१, रा. जवळगाव) यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आरोपी लक्ष्मण साधू हारे, सुनील विठ्ठल गायकवाड आणि प्रदुम सुनील गायकवाड हे सुरजच्या दुकानात आले. आरोपी लक्ष्मण याने सुरजला ‘तुझ्या दुकानात दारू पिऊ दे’ अशी मागणी केली.
सुरजने विरोध केला असता, आरोपींनी त्याला शिवीगाळ करत चापटबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. आरोपी सुनील याने वेळूच्या काठीने सुरजच्या दोन्ही हातांवर वार करून त्याला जखमी केले, तर प्रदुम याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारले. बर्दापूर पोलिसांनी या तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार राठोड अधिक तपास करत आहेत.