Breaking

ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अडवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; वडवणी येथील प्रकार

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अडवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; वडवणी येथील प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

वडवणी: वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे बंद असलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्याच्या शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून इतर काही अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाची अवज्ञा केल्याचा ठपका आरोपींवर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी डॉ. उमेश विश्वंभर करमळकर (वय ५८, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय चिंचवाण) यांनी वडवणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम सुरू करण्यासाठी बांधकाम साहित्याचा टिप्पर आला होता. मा. उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या आदेशानुसार हे काम सुरू करण्यात येत होते.

मात्र, आरोपी गोविंद अशोक चाटे, किशोर रामेश्वर चाटे आणि इतर ३-४ जणांनी बेकायदेशीररीत्या गोंधळ घालून टिप्परचा रस्ता अडवला. आरोपींनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून बांधकाम सुरू करू दिले नाही. वडवणी पोलिसांनी या सर्वांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार उबाळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts