Breaking
Updated: एप्रिल 18, 2026
सिंदफना पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो जप्त; १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव: माजलगाव ग्रामीण पोलिसांनी देपेगाव शिवारातील सिंदफना नदी पात्रात धाड टाकून विनापरवाना अवैध वाळूची वाहतूक करणारा एक टाटा ४०७ टेम्पो रंगेहाथ पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी टेम्पोसह सुमारे १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस अंमलदार गोविंद बाबासाहेब बाबरे यांनी या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सिंदफना नदी पात्रात वाळूची चोरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता, आरोपी सोहेल जाफर सय्यद (वय २०, रा. पंचवटीनगर, माजलगाव) हा टेम्पोमध्ये वाळू भरून वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी १० लाख रुपये किमतीचा टाटा ४०७ टेम्पो आणि ६ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू जप्त केली आहे. आरोपीने टेम्पोचा पासिंग आणि चेसिस नंबर अर्धवट खोडलेला होता. माजलगाव ग्रामीण पोलिसांनी सोहेल सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.