Breaking

उभ्या पिकाला लावली आग; जिवंत जाळण्याची धमकी देत नेकनूरमध्ये दहशत

Updated: एप्रिल 18, 2026

By Vivek Sindhu

ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम अडवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा; वडवणी येथील प्रकार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: नेकनूर तालुक्यातील अंजणवती येथे शेतीच्या जुन्या वादातून एका ७६ वर्षीय वृद्धाच्या उभ्या ज्वारीच्या पिकाला आग लावून जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे वृद्धाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आरोपींनी त्यांना जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे.

या प्रकरणी शेषमोहन रामभाऊ येडे (वय ७६, रा. अंजणवती) यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सव्वा एक वाजेच्या सुमारास आरोपी परमेश्वर छबुराव येडे, उमाकांत मुरलीधर, चंद्रकांत बापुराव येडे आणि सूर्यकांत अनुबा येडे यांनी शेषमोहन यांच्या शेतात घुसून जुन्या भांडणाची कुरापत काढली.

आरोपी परमेश्वर याने खिशातील काडीपेटी काढून शेषमोहन यांच्या उभ्या ज्वारीच्या पिकाला आग लावली. यात संपूर्ण पीक जळून खाक झाले. ‘जर कोणाला सांगितले तर तुलाही पिकात टाकून जिवंत जाळून टाकू’ अशी धमकी आरोपींनी दिली. नेकनूर पोलिसांनी या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार शेख अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts