Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
महिलेचे मंगळसूत्र लांबवले; तोंडाला मास्क लावून आलेल्या चोरट्यांचा प्रताप
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: आष्टी तालुक्यातील खानापूर रोडवर पायी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी ओरबाडून नेले. भरदिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे.
या चोरीबाबत रोहिणी तुळशीराम गोल्हार (वय ३८, रा. रुटी इमानगाव, ता. आष्टी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. रोहिणी या १६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रुटी-खानापूर रोडने आपल्या शेताकडे जात होत्या. यावेळी समोरून एका दुचाकीवर तोंडाला मास्क लावून दोन अनोळखी इसम आले. त्यांनी रोहिणी यांच्या जवळ दुचाकी हळू केली आणि पाठीमागे बसलेल्या चोरट्याने अचानक त्यांच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र ओढून तोडले.
चोरटे काही क्षणातच दुचाकीवरून पसार झाले. या चोरीमुळे रोहिणी यांचे अंदाजे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आष्टी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.