Breaking

पाणी पिण्याच्या कारणावरून गॅरेज चालकाला बेदम मारहाण

Updated: एप्रिल 17, 2026

By Vivek Sindhu

; दुचाकी आणि कत्ती जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई-अंबाजोगाई रोडवरील जवळगाव येथे पाणी पिण्याच्या साध्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी करण्यात आले आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या मारहाणीबाबत प्रद्युम्न सुनील गायकवाड (वय २७, रा. जवळगाव) याने फिर्याद दिली आहे. प्रद्युम्न हा आपल्या ‘साई गॅरेज’ समोर उभा असताना आरोपी लक्ष्मण उर्फ सोनु गणेश शिंदे, योगेश काळे आणि मनोज विठ्ठल गव्हाणे (सर्व रा. जवळगाव) यांनी त्याला पाणी पिण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी लक्ष्मण याने गॅरेज समोर पडलेला लोखंडी पाईप उचलून प्रद्युम्नच्या उजव्या पायावर जोरात मारला.

इतर दोन आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून मुका मार दिला. या हल्ल्यात प्रद्युम्न गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस हवालदार राठोड या घटनेचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts