Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
मस्साजोग शिवारात दहा लाखाचा गुटखा पकडला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelदोन दिवसापूर्वी गुटखा माफियाने केला होता शिक्षकावर जीवघेणा हल्ला
केज :- केज तालुक्यात मस्साजोग शिवारात असलेल्या एका पत्र्याच्या शेडवर केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने छापा मारून शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये साठवून ठेवलेला दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी गुटखा माफिया विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मस्साजोग ता. केज येथील रोहित आसाराम देशमुख याने काळेगावघाट रस्त्या वरील रंजीत बाजीराव देशमुख यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राज्यात विक्री, सेवन आणि वाहतुकीस बंदी असलेला गुटख्याचा साठा करून ठेवल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांनी मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले, आदेश मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक जावेद कराडकर, पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, जमादार बालासाहेब डापकर, विकास चोपणे, धोंडीराम मोरे, विशाल क्षीरसागर, आशपाक इनामदार यांच्या पथकाने १७ एप्रिल रोजी दुपारी २:०० वाजता अचानक मस्साजोग शिवारातील पत्र्याच्या शेडवर छापा मारला. पत्र्याच्या शेडची झडती घेतली असता त्या मध्ये पांढऱ्या, निळ्या, गुलाबी रंगाच्या पोत्यासह पिशव्या व खोक्याध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला व राज्यात प्रतिबंधीत केलेला गुटखा सुगंधीत तंबाखु व पान मसाला मिळून आला. पोलिसांनी दहा लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादी वरून रोहित देशमुख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर रोहित देशमुख हा फरार झाला आहे.
दोन दिवसा पूर्वी गुटखाफियाने केला होता एका शिक्षकावर खुनी हल्ला :- आमच्या गुटखा तस्करीचा माहिती पोलिसांना दिल्याने आमचे नुकसान झाले. या संशया वरून केजमध्ये १४ एप्रिल रोजी मोसिन केरेशी या प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला मुजाहीद खैरूमिया खुरेशी आणि आबुजर खैरुमिया खुरेशी या
दोघा गुटखा माफियाने फायटरने मारहाण करून जखमी करून जीवघेणा हल्ला केला होता. गुटखा माफियावर कठोर कारवाई करून त्यांच्यावर मकोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी फिर्यादीने केली होती. त्या नंतर पोलिस सतर्क झाले आहे मसाजोग येथे त्यांनी गुटख्याच्या साठ्यावर छापा मारला.