Breaking

मस्साजोग येथे सरपंच पदासाठी अश्विनी देशमुख – स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत

Updated: एप्रिल 17, 2026

By Vivek Sindhu

मस्साजोग येथे सरपंच पदासाठी अश्विनी देशमुख - स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – मस्साजोग (ता. केज) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्याने आता त्यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. त्यामुळे आता मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार ? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 

      मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर स्व. संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध काढण्याचा विचार ग्रामस्थांतून केला जात होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर स्व. संतोष देशमुख यांच्या विरोधात नऊ मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यात आणखी संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख या तिघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या १७ एप्रिल पर्यंत निवडणूक बिनविरोध होण्याच्या आशा होत्या. मात्र स्वरूपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज ठेवल्याने व इतर तिघांनी अर्ज काढून घेतल्याने ही निवडणूक होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अश्विनी देशमुख व स्वरूपानंद देशमुख यांच्यात ही लढत होत असून मतदार आता कोणाच्या बाजूने कौल देतात ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

वरपगाव सरपंच पदी अमृता कांबळे बिनविरोध 

वरपगाव (ता. केज) येथील अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणूकीत अमृता आकाश कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध झाली आहे. तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणूकीत आरणगाव येथील प्रभाग क्र.१ मधून हिंदुराजा देविदास इतापे, बोरगाव बु. येथील प्रभाग क्र. १ मधून नानासाहेब जालिंदर गव्हाणे, औरंगपूर येथील प्रभाग क्र. २ मधून आशा सुधीर रानमारे या तिघांचे एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर

राजेगाव येथील प्रभाग २ मधील एका जागेसाठी एक ही उमेदवारी अर्ज आला नाही.


Categories

Recent Posts