Breaking

साळेगाव येथे घराचे पाठी मागील दरवाजाचे कुलूप तोडून धाडसी घरोफोडी

Updated: एप्रिल 17, 2026

By Vivek Sindhu

दीड लाख रु रोख आणि ६८ ग्रॅम सोन्याचे दागिन्याची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दीड लाख रु रोख आणि ६८ ग्रॅम सोन्याचे दागिन्याची चोरी, घटनास्थळी श्ववानपथक आणि ठसे तज्ज्ञांची भेट

केज:- केज तालुक्यातील साळेगाव येथे मध्यरात्री घराच्या पाठीमागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून बेडरूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी पेटीसह आतील नगदी दीड लाख रु. रोख रक्कम आणि ६८ ग्रॅम  वजनाचे सोन्याचे दागिने याची चोरी करून धाडसी घरफोडी केल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी तसेच ठसे तज्ञ आणि शानपथकांनी भेट देऊन चोरीचा तपास सुरू केला आहे.

केज तालुक्यातील साळेगाव येथील दत्ता तोंडे यांच्या साळेगाव येथील राहत्या घरी दिनांक १८ एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजवण्याच्या सुमारास अज्ञात चोरटाने घराच्या मागील बाजूचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून बेडरूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्या नंतर चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटात ठेवलेले दीड लाख रु. व लोखंडी पेटीतील सोन्याच्या एकूण ग्रॅम वजनाच्या पाच अंगठ्या, सोन्याची चैन, पुतळ्या आणि सेवन पीस असे सर्व मिळून ६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि शेत माल विक्रीचे दीड लाख रु असा एकूण मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी लोखंडी पेटी घेऊन घरच्या शेजारी असलेल्या शेतातील एका ओढ्याजवळ जाऊन पेटी उघडून त्यातील कपडे टाकून दिले. तसेच रिकामी पेटी तेथेच टाकून पोबारा केला. तसेच घरातील कपाट असलेले सामान, दागिन्यांचे रिकामे डब्बे घरात इतस्ततः विखुरले.

चोरट्यांच्या आवाजाने दत्ता तोंडे यांची वृद्ध आई गवळण बाई तोंडे यांनी त्यांच्या सून झालेल्या खोलीत आवाज दिला मात्र चोरट्यांनी त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली होती. त्या नंतर गवळणबाई यांनी घरा शेजारी असलेल्या गोठ्यात त्यांच्या नातवांना पळत जाऊन उठविले आणि चोरटे घरात शिरल्याची माहिती दिली. ते घरात येई पर्यंत चोरट्यांनी सर्व ऐवज लुटून नेला होता.

या घरफोडी प्रकरणी दत्ता तोंडे यांचा मुलगा सुरज तोंडे यांनी केज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या घरफोडी प्रकरणी दत्ता तोंडे यांचा मुलगा सुरज तोंडे यांनी केज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

_______________________________

श्वान पथकांनी काढला रोड पर्यंत माग :- पोलिसांनी बीड येथील श्वान पथकाला पाचारण करून या धाडसी चोरीचा तपास केला. श्वानाने घराच्या पाठीमागील दरवाजा पासुन ओढ्याच्या पर्यंत आणि पुढे केज कळंब रोड पर्यंत माग काढला. त्या नंतर चोरटे वाहनाने कळंबच्या दिशेने गेले असावेत.

________________________________

ठसे तज्ज्ञांची भेट :- ठसे तज्ज्ञांची घरातील कुलूप, कपाटाचे हँडल आणि चोरट्यांनी हात लावल्याचा संशयित वस्तू यावरील त्यांच्या हातांचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

______________________________

दत्ता तोंडे कारागृहात असताना झाली चोरी :- ज्या ऊस तोड मुकादमच्या घरी घरफोडी झाली ते दत्ता तोंडे हे एका गंभीर गुन्ह्यात धाराशिव येथील कारागृहात असल्याने त्यांच्या घरी त्यांची वृद्ध आई, पत्नी, आणि दोन मुले घरी असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केली.


Categories

Recent Posts