Breaking

किरकोळ वादातून तुंबळ हाणामारी; लोखंडी गजाने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Updated: एप्रिल 17, 2026

By Vivek Sindhu

लोखंडी गजाने कुटुंबावर जीवघेणा हल्ला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा: पाटोदा शहरातील शिवाजी चौकात किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या वादात एका कुटुंबाला लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या मारहाणीबाबत चंद्रकला अशोक गर्जे (वय ४४, रा. माऊली नगर, पाटोदा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा भाचा अमन अशोक गर्जे याला काहीही कारण नसताना आरोपी अजिंक्य आनंद जाधव, शिवम संपत जाधव, आदित्य संपत जाधव, शिवम जाधव पाटील आणि युवराज शिवाजी झनझने (सर्व रा. पाटोदा) यांनी अडवले. आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून अमन याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चंद्रकला गर्जे या भांडण सोडवण्यासाठी गेल्या असता, त्यांना, त्यांच्या मुलांना आणि दिराला देखील आरोपींनी लोखंडी गजाने मारहाण केली. आरोपींनी सर्वांना जिवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली.

या घटनेनंतर पाटोदा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


Categories

Recent Posts