Breaking

घाटनांदुरमध्ये अपंग तरुणाला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 17, 2026

By Vivek Sindhu

घाटनांदुरमध्ये अपंग तरुणाला मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे एका ४७ टक्के अपंग असलेल्या तरुणाला विनाकारण अडवून मारहाण केल्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना रेल्वेगेटजवळ १५ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या मारहाणीबाबत अमर गुलाबसिंग गुणावत (वय ३६, रा. घाटनांदुर) या तरुणाने तक्रार दिली आहे. अमर हा पायाने अपंग असून तो एका पेट्रोल पंपावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. घटनेच्या रात्री तो आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेल्वेगेटजवळ त्याची चप्पल पडली. चप्पल उचलण्यासाठी त्याने गाडी बाजूला लावली असता, आरोपी गणेश बालासाहेब जाधव (रा. घाटनांदुर) तिथे आला. तू हायवा गाडीला आडवा का आलास, असे म्हणत त्याने अमरला शिवीगाळ करून चापटीने मारहाण केली. तसेच पुन्हा गाडीला आडवा आलास तर जिवे मारीन, अशी धमकीही दिली.

अमर गुणावत याच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी गणेश जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब डोंगरे हे करत आहेत.


Categories

Recent Posts