Breaking
Updated: June 12, 2025
WhatsApp Group
Join Nowविद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यासाठी पुरस्काराचे स्वरूप, निकष व इतर गोष्टी ठरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ . विजय फुलारी यांचे अध्यतेखाली गठित केलेल्या समितीमध्ये येथील योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विषयाचे प्रा . विश्वास साखरे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे यांच्या नावाने सदर पुरस्कार उत्कृष्ट महाविद्यालयास देण्यात येणार असून डॉ . साखरे यांच्या नियुक्ती बद्दल योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर बर्दापूरकर, माजी अध्यक्ष डॉ . सुरेश खुरसाळे,उपाध्यक्ष श्री. गणपत व्यास, सचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष डॉ . शैलेश वैद्य,जेष्ठ सल्लागार प्रा . एन के . गोळेगावकर, सहसचिव प्रा. भिमाशंकर शेटे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे .