अंबाजोगाई -: निराधार व गरीब कुटुंबातील महिलांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीच्या वतीने शिवणकला प्रशिक्षण कार्यशाळा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत ४० महिलांनी सहभाग घेतला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून मुली व महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची क्षमता निर्माण करणे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे. आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. २१ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ही प्रशिक्षण कार्यशाळा दररोज सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत
रफत नासेर काझी या प्रशिक्षक अलिजा फॅशन, चौभारा गल्ली, अंबाजोगाई येथे होत आहे.प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलीला व महिलेला संपूर्ण प्रशिक्षण किट प्रदान करण्यात आली आहे.ज्यामुळे त्यांना प्रशिक्षण घेणे अधिक सोयीचे होणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष शेख शकील बागवान, सचिव राधेश्याम लोहिया, प्रोजेक्ट चेअर रो. कल्पना मुळावकर, वूमन एम्पॉवरमेंट चेअर स्वरूपा कुलकर्णी, राजेंद्र घोडके, मोईन शेख, संतोष मोहिते, सुरेश अरसुडे, अजित देशमुख, धनराज सोळंकी, बाळासाहेब कदम, रुपेश रामावत, अभिजीत बंडगर, रोटरॅक्टचे अध्यक्ष मयूर परदेशी आणि संदीप जाधव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन संतोष मोहिते यांनी केले.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!