Breaking
Updated: ऑगस्ट 13, 2025
अंबाजोगाईत जुन्या वादातून महिलेला कोयत्याने मारहाण; दोघांवर गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : जुन्या वादातून एका महिलेला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी आई-मुलावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गवळणबाई श्रीपती माने (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. परळीवेस, अंबाजोगाई) या ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या चुलत भावजयीसोबत घरासमोरील दारात बोलत बसल्या होत्या. यावेळी त्याच गल्लीत राहणारी आरोपी पद्मीनबाई विष्णु जोगदंड (वय ५०) हिने जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली.
त्यानंतर तिचा मुलगा किशोर विष्णु जोगदंड (वय ३०) याने संतापाच्या भरात फिर्यादीच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ४०४/२०२५, कलम ११८(१), ३५२, ३५१(२)(३), ३(५) भा.न्या.सं. २०२३ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास पोलीस हवालदार भागवत करत आहेत.