Breaking

न्यु व्हिजन पब्लिक स्कूल येथे दहावीतील गुणवंतांचे कौतुक..!

Updated: एप्रिल 23, 2026

By Vivek Sindhu

विद्यार्थ्यांत ध्येयवाद रूजविणारे न्यु व्हिजन पब्लिक स्कूल - डॉ.राजेश इंगोले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विद्यार्थ्यांत ध्येयवाद रूजविणारे न्यु व्हिजन पब्लिक स्कूल – डॉ.राजेश इंगोले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – केंद्रिय शिक्षण मंडळ अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन तर्फे फेब्रुवारी आणि मार्च-२०२६ महिन्यांत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कूलने दहावी सी.बी.एस.ई बोर्ड (इंग्रजी माध्यम) परीक्षेत सलग १६ व्या वर्षीही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचे परीक्षेसाठी बसलेले सर्वच्या सर्व ९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेच्या वतीने आयोजित एका विशेष समारंभात करण्यात आले.

बुधवार, दिनांक २२ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य वसंतराव चव्हाण, तर विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ राजेश इंगोले हे होते. तर यावेळी विचारमंचावर श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी संचालक सौ.डिंपल संकेत मोदी, समन्वयक विनायक मुंजे आणि न्यु व्हिजन पब्लिक स्कूलचे प्राचार्य पांडुरंग पाटील हे उपस्थित होते. सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी पुजन आणि दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी सांगितले की, पापा मोदी यांनी व्यापक दृष्टीकोन ठेवून अंबाजोगाईत मुंबई, पुणे, नागपुर व छत्रपती संभाजीनगरच्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण व सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देत न्यु व्हिजन पब्लिक स्कूल सुरू केले. या शाळेने सतत १६ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून गुणवता जोपासली आहे. संस्थेने संकेत मोदी यांच्या कल्पकतेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शैक्षणिक क्षेत्रात अंबाजोगाई पॅटर्न निर्माण केला आहे. समाज समृद्ध झाला तर देश महासत्ता होईल अशी धारणा महापुरूषांची होती. रामायण काळ ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंतची शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारी परंपरा त्यांनी नमूद केली. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश शिक्षक घेऊन आले आहेत. त्यामुळे मन, मेंदू आणि मनगट सशक्त होते. आजची पिढी ही जेन झी आहे. या पिढीकडे गती आहे. पण, जीवनात फक्त गतीच महत्त्वाची नाही तर आपणांस कुठे जायचे, नेमके काय करावे हे कळले पाहिजे. आपले ध्येय निश्चित करा. काय बनायचं आहे ते आत्ताच ठरवा. नैतिक अधिष्ठान आहे म्हणूनच पालक मुलांना शिक्षकांकडे सोपवतात. परदेशी विद्यापीठांच्या वतीने भारतात नवनवे अभ्यासक्रम शिकण्यासाठी सोय उपलब्ध झाली आहे. ते शिकून आपण जगाच्या स्पर्धेसाठी तयार राहावे. बदलांना सामोरे जा, नवे तंत्रज्ञान, विज्ञानवाद स्वीकारा, तरच आपण यशस्वी होवूत. शिक्षण हे केवळ मार्कांची स्पर्धा नाही तर शिक्षणामुळे जगण्याचा हेतू समजतो. मनात सकारात्मक विचार ठेवल्यास हमखास यश मिळते. न्यु व्हिजन पब्लिक स्कूल हे विद्यार्थ्यांत ध्येयवाद रूजविणारे आहे असे प्रतिपादन डॉ.इंगोले यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक करताना प्राचार्य पांडुरंग पाटील यांनी सांगितले की, अंबाजोगाई येथे राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकार्यांनी एकत्र येत सन २००४ साली श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणाऱ्या न्यु व्हिजन पब्लिक स्कूल या शाळेची स्थापना केली. शाळेने स्थापनेपासून १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी/मार्च-२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत शाळेच्या सर्वच्या सर्व ९६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत नवा उच्चांक निर्माण करून पुन्हा एकदा अंबाजोगाईचे नांव शैक्षणिक क्षेत्रात उंचावले आहे. विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि शिक्षकांचे योगदान आहे. न्यु व्हिजन पब्लिक स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कोणतीही गोष्ट, परीक्षा अशक्य नाही. आमचे विद्यार्थी यश संपादन करतातच. याकामी आम्हाला व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, सौ.डिंपल संकेत मोदी तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक प्राचार्य डॉ.बी.आय.खडकभावी, उपप्राचार्य प्रा.वसंतराव चव्हाण, प्राचार्य डॉ.डी.एच.थोरात, प्रा.एस.ए.बिराजदार, प्रा.राघवेंद्र राजमान्य, समन्वयक विनायक मुंजे, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचे प्राचार्य पांडुरंग पाटील यांनी सांगितले. यावेळी प्रतिक घुले व कु.अनन्या चव्हाण यांनी सत्काराला उत्तर दिले. तर पालक प्रतिनिधी सुशिलकुमार मुकडे यांनी न्यु व्हिजन पब्लिक स्कूल या शाळेतील शिक्षकवृंद हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतात असे सांगितले. तर पालक प्रतिनिधी किर्तीराज लोणारे यांनी हि शाळा चांगली आहे. नियमित अभ्यासक्रमा सोबतच विद्यार्थ्यांमध्ये एआयच्या आधुनिक काळात उपयोगी पडतील अशी कौशल्ये विकसित केली जातात. देशाचे सुजाण नागरिक या शाळेतून घडवले जातात. पालकांनो मुलांचा कल ओळखा व त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन लोणारे यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा.वसंतराव चव्हाण यांनी सांगितले की, न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. दहावी उत्तीर्ण होणे म्हणजे आयुष्यात पुढे जाण्यासाठी ही एक पायरी आहे. आपल्या इच्छा, अपेक्षा मुलांवर लादू नका. मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिकू द्या असे आवाहन केले, सलग सोळाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखल्याबद्दल प्रा.चव्हाण यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. यावेळी दहावी परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत गुणानूक्रमे उत्तीर्ण झालेल्या २२ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात १) प्रतिक धनराज घुले (९८.२० टक्के), २) शौनक मंगेश अकोलकर (९८ टक्के), ३) अनन्या संदीप चव्हाण (९६.६० टक्के), ४) संचित सुशीलकुमार मुकडे (९५.४० टक्के), ५) प्रिया सौदागर कांदे (९४.२० टक्के), ६) स्वरा कल्याणराव लोमटे (९४ टक्के), ७) मंथन मनोजकुमार वेदपाठक (९४ टक्के), ८) अभिनव रमाकांत फड (९३.४० टक्के), शाल्वी अंकुश चव्हाण (९३ टक्के), १०) संजय सिद्धेश्वर नायबळ (९२.६० टक्के), ११) सुफियान उमर सय्यद (९२.६० टक्के), १२) रोहन अमोल शेप (९१.८० टक्के), १३) यशश्री कृष्णा सरवदे (९१.८० टक्के), १४) धम्मप्रिया किर्तीराज लोणारे (९१.६० टक्के), १५) श्रुती शिवानंद चाळक (९१.४० टक्के), १६) अर्जुन प्रशांत पाटील (९१.२० टक्के), १७) शिवदत्त लक्ष्मण भारती (९१ टक्के), १८) श्रुष्टी माणिक सिरसाट (९०.८० टक्के), १९) जिगिषा राधेकुमार नागरगोजे (९०.६० टक्के), २०) ऐश्वर्या ज्ञानेश्वर देशमुख (९० टक्के), २१) क्षितिज सूर्यकांत आरडले (९२ गुण हिंदी विषयात), २२) शताक्षी दत्तात्रय आपेट (९९ गुण मराठी विषयात), सत्कार झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांत शंभर पैकी शंभर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नांवे आणि विषयांचे गुण पुढीलप्रमाणे आहेत. १) सुफियान उमर सय्यद याने इंग्रजी विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवले., २) धम्मप्रिया किर्तीराज लोणारे हिने इंग्रजी विषयात १०० पैकी ९७ आणि आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले., ३) क्षितिज सूर्यकांत आरडले याने हिंदी विषयात १०० पैकी ९२ गुण मिळवले., ४) प्रिया सौदागर कांदे हिने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले., ५) संजय सिद्धेश्वर नायबळ यांनी मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले., ६) शताक्षी दत्तात्रय आपेट हिने मराठी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवले., ७) जिगिषा राधेकुमार नागरगोजे यांनी संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले., ८) प्रतिक धनराज घुले याने संस्कृत आणि आयटी विषयात १०० पैकी १०० तसेच सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवले., ९) अनन्या संदीप चव्हाण हिने संस्कृत विषयात १०० पैकी १००, गणित विषयात १०० पैकी ९६ आणि सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवले., १०) शौनक मंगेश अकोलकर याने विज्ञान आणि आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले., ११) शाल्वी अंकुश चव्हाण हिने सामाजिक शास्त्र विषयात १०० पैकी ९७ गुण मिळवले., १२) स्वरा कल्याणराव लोमटे हिने आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले., १३) यशश्री कृष्णा सरवदे हिने आयटी विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे फेटा बांधून, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात समन्वयक रवींद्र राजगुरू (इंग्रजी), वर्ग शिक्षक नितीन जोशी (विज्ञान), प्रविण कुमार (इंग्रजी), जयशंकर त्रिपाठी (विज्ञान) तसेच विषय शिक्षक शुभांगी विजापुरे (आयटी), गोपालकृष्णा (विज्ञान), हेमलता मस्के (गणित), जयंती दाम (समाजशास्त्र), दत्तात्रय नेवल (मराठी), प्रकाश पांडे (हिंदी), स्नेहाशिष कुमार (गणित), प्रियंका गित्ते (स्पोर्ट्स) या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक जयशंकर त्रिपाठी व केथेश्वरण यांनी केले. तर उपस्थितांचे आभार समन्वयक रवींद्र राजगुरू यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षीका, कर्मचारीवृंद आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास माता व पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Posts :

Categories

Recent Posts