Breaking

दुकानासमोर रस्ता बंद करून अडथळा; एकावर गुन्हा

Updated: ऑगस्ट 19, 2025

By Vivek Sindhu

दुकानासमोर रस्ता बंद करून अडथळा; एकावर गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : माळीवेस चौक येथे सलून दुकानदारासमोर अडथळा निर्माण करून त्याला शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी एका इसमाविरोधात बीड शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ सुधाकर दोडके (वय 35, रा. काळे गल्ली, बीड) हे आपले सलूनचे दुकान चालवतात. ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुकानात असताना, आरोपी विलास आसाराम बावने (रा. एमआयडीसी, बहीरवाडी पेठ, बीड) याने दुकानासमोरील रस्ता बंद केला. यामुळे दोडके व त्यांच्या गिऱ्हाईकांना ये-जा करण्यास अडथळा निर्माण झाला.

या प्रकाराबाबत दोडके यांनी विरोध दर्शवला असता, बावने याने “साहित्य बाजूला काढणार नाही, तुला काय करायचे ते कर” असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी विलास बावणे याच्यावर बीड शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


Categories

Recent Posts