Breaking
Updated: एप्रिल 17, 2026
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशीसाठी रस्ता रोको आंदोलन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज : तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघातीय मृत्यूची चौकशी आणि इतर मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले.
तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी, कानडी रस्त्याची २४ तासात दुरुस्त करावी व लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे १५ ऑगस्टपूर्वी नगरपंचायतीकडे हस्तांतरण करण्यात यावे या मागण्यासाठी केज विकास संघर्ष समितीच्या वतीने केज – मांजरसुंबा रस्त्यावर तहसील कार्यालया समोर शुक्रवारी सकाळी ११ वाजता अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रशासनाच्या वतीने मयत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघात व मृत्यूची विशेष चौकशी स्थानिक गुन्हा शाखेकडे सोपविण्यात आली असून घटनेचे संपूर्ण सत्य शोधून काढले जाईल. अपूर्ण असलेल्या कानडी रस्त्याचे दोन्ही बाजूचे पंखे भरुन येत्या २० एप्रिलपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे नाट्यगृहाचे काम १५ ऑगष्ट पूर्वी पूर्ण करून नाट्यगृह नगरपंचायतीकडे सोपवले जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे, अभियंता मोहनराव कराड, संपत वाघमारे, गौतम बचूटे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.