Breaking

बीड जिल्ह्यात तीन जुगार अड्ड्यांवर छापे; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Updated: ऑगस्ट 14, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्ह्यात तीन जुगार अड्ड्यांवर छापे; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर नियंत्रणासाठी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने एका दिवसात तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर कारवाई करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पहिल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांच्या पथकाने केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदुरघाट येथे दिक्षा किराणा दुकानामागे चालणाऱ्या तिरट जुगारावर छापा टाकून दहा जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तिरट जुगार साहित्य, नगदी, मोबाईल आणि मोटारसायकली असा एकूण २ लाख ६३ हजार ६० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत त्याच पथकाने दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेलगाव–परळी रोडलगत इसार पेट्रोलपंपाच्या मागे सुरू असलेल्या तिरट जुगारावर छापा मारला. येथे सहा जणांना अटक करून २ लाख १२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकाने पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागोबा गल्ली येथे तिरट जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दुचाकी, मोबाईल आणि नगदी असा ६ लाख ३५ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.

या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.


Categories

Recent Posts