Breaking

कपिलधार येथे पोलीस कर्मचाऱ्याला दर्शनाच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

कपिलधार येथे पोलीस कर्मचाऱ्याला दर्शनाच्या कारणावरून शिवीगाळ व धमकी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : कपिलधार येथील मन्मथ स्वामी मंदिर परिसरात दर्शनाच्या कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्याला अडवून त्याला शिवीगाळ, धमकी तसेच वर्दीचा अपमान केल्याची घटना सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) दुपारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अतिश रेणदेव मोराळे (वय ४४, नेमणूक पोलीस स्टेशन बीड ग्रामीण) हे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कर्तव्य बजावत असताना, आरोपी अचित राजाभाऊ धुताडमल (रा. माळापुरी, ता. व जि. बीड) हा सुमारास १ वाजता मन्मथ स्वामी मंदिर, कपिलधार येथे दर्शनासाठी आला. दर्शनासंदर्भात हुज्जत घालत आरोपीने मोराळे यांना आरडाओरड, शिवीगाळ केली व “तुला पाहून घेतो” अशी धमकी दिली. यावेळी त्याने फिर्यादीची गच्ची पकडून वर्दीचा अपमान केला.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून सपोनि बाळराजे दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Categories

Recent Posts