Breaking
Updated: एप्रिल 25, 2026
वैयक्तिक वादातून तरुणावर दगडाने आणि लोखंडी रॉडने हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तू तुझ्या बायकोला फोन का लावतोस, असे म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करून लोखंडी रॉडने जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील शिंदी फाटा येथे घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज दादाराव वाघमारे (वय ३० वर्ष, रा. विडा) हे शिंदी फाटा येथील एका कटिंगच्या दुकानासमोर बसलेले होते. त्यावेळी आरोपी दीपक उत्तम वाघमारे आणि त्याचा मित्र प्रेम तिथे आले. दीपकने पंकजच्या पाठीमागून येऊन त्याच्या डोक्यात दगडाने प्रहार केला. “तू तुझ्या बायकोला सतत फोन का लावतोस? आता ती तुझी राहिली नाही ती माझी झाली आहे,” असे म्हणून दीपकने गाडीचा लोखंडी रॉड काढून पंकजच्या हातावर आणि पायावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पंकज गंभीर जखमी झाले असून पोलीस हवालदार मुंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.