Breaking

पाईपलाईन दुरुस्तीच्या वादातून प्राणघातक हल्ला; लोखंडी टामीने शेतकऱ्याला केले गंभीर जखमी

Updated: एप्रिल 25, 2026

By Vivek Sindhu

पाईपलाईन दुरुस्तीच्या वादातून प्राणघातक हल्ला; लोखंडी टामीने शेतकऱ्याला केले गंभीर जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी: तालुक्यातील केळसांगवी येथे तलावातून गाळ काढताना फुटलेली पाईपलाईन दुरुस्त करून देण्यास सांगितल्याच्या रागातून एका शेतकऱ्यावर लोखंडी टामीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना २१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:१५ वाजता घडली असून याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगाधर नवनाथ पडोळे (वय ४२ वर्ष, रा. केळसांगवी) यांची पाण्याची पाईपलाईन तलावातील गाळ काढताना आरोपींनी फोडली होती. गंगाधर यांनी आरोपी भाऊसाहेब मोहन घुले, बाळासाहेब सोमीनाथ भालके आणि महादेव भाऊसाहेब घुले यांना सदर पाईपलाईन दुरुस्त करून देण्यास सांगितले. याचा राग आल्याने भाऊसाहेब घुले याने हातातील लोखंडी टामीने गंगाधर यांच्या डोक्यात जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले. इतर दोन आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी गंगाधर यांच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार घाडगे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts