Breaking

धारूर पंचायत समितीच्या कार्यालयातून शासकीय लॅपटॉपची चोरी

Updated: एप्रिल 25, 2026

By Vivek Sindhu

धारूर पंचायत समितीच्या कार्यालयातून शासकीय लॅपटॉपची चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: धारूर पंचायत समितीच्या कार्यालयातून अज्ञात चोरट्याने शासकीय कामासाठी वापरला जाणारा लॅपटॉप चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी घडली असून याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुका अभियान व्यवस्थापन कार्यालयातील कर्मचारी शेख इरफान शेख इलाही यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. कोणीतरी अज्ञात चोरटा पंचायत समितीच्या कार्यालयात शिरला आणि त्याने तेथील एच.पी. कंपनीचा लॅपटॉप (HP 245 G 10) लंपास केला. चोरी गेलेल्या या लॅपटॉपची किंमत अंदाजे १०,००० रुपये आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार दुधाने या चोरीचा तपास करत आहेत.


Categories

Recent Posts