Breaking

दगडफेक करून पिकअपच्या काचा फोडल्या; एकाला बेदम मारहाण

Updated: एप्रिल 25, 2026

By Vivek Sindhu

दगडफेक करून पिकअपच्या काचा फोडल्या; एकाला बेदम मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: जुन्या वादातून चुलत भावाला मारहाण करणाऱ्या आरोपींनी मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला अडवून त्यांच्या पिकअप गाडीवर दगडफेक करत नुकसान केले. ही घटना २० एप्रिल २०२६ रोजी मादळमोही येथील जव्हारवाडी चौकात घडली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नामदेव दगडू पवार (वय ५० वर्ष, रा. वसंत नगर तांडा) हे त्यांच्या शेतात असताना आरोपी संतोष शिवनाथ ढाकणे, शिवनाथ वामन ढाकणे आणि सरस्वती शिवनाथ ढाकणे यांनी त्यांच्या चुलत भावावर दगडफेक केली होती. त्यानंतर फिर्यादी जखमींना घेऊन जात असताना आरोपी सिद्धार्थ मारुती गोल्हार याने आपली मोटारसायकल आडवी लावून नामदेव पवार यांना अडवले. सिद्धार्थने हातात दगड घेऊन नामदेव यांच्या बरगडीवर मारून त्यांना जखमी केले आणि त्यांच्या पिकअप गाडीच्या काचा फोडून नुकसान केले. पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार गुजर पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts