Breaking
Updated: एप्रिल 25, 2026
ठिबक पाईप टाकण्यावरून शेतकरी कुटुंबावर हल्ला; एकाचा हात फॅक्चर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी: शेतातील ठिबक पाईपच्या बंडलवरून झालेल्या वादात शेजारील शेतकऱ्याने आपल्या दोन मुलांसह मिळून एका शेतकऱ्याला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचा उजवा हात फॅक्चर झाला असून वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बाळासाहेब मच्छिंद्र आगे (वय ४२ वर्ष, रा. देवडी) हे १४ एप्रिल रोजी त्यांच्या उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी शेजारील शेतकरी रामेश्वर माणिकराव आगे, धनंजय रामेश्वर आगे आणि कुमार रामेश्वर आगे यांनी त्यांच्या शेतातील ठिबकचे बंडल बाळासाहेब यांच्या शेतात टाकले होते. “हे पाईप आमच्या शेतात का टाकले?” असे विचारल्याचा राग आल्याने आरोपींनी बाळासाहेब यांची गचांडी धरून त्यांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली. धनंजय आणि कुमार आगे यांनी बांबूच्या काठीने बाळासाहेब यांच्या पाठीवर आणि हातावर प्रहार केला, ज्यामध्ये त्यांचा उजवा हात फॅक्चर झाला. पोलीस हवालदार ढोबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.