Breaking
Updated: एप्रिल 25, 2026
गव्हाचे भुसकट पेटवल्याने ३० गुंठे ऊस आणि ठिबक जळून खाक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड शहर: जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या (ICU) बाहेर बसवलेल्या १५ एअर कंडिशनचे कॉपर वायर आणि पाईप अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे रुग्णालयातील यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक नागेश शिवाजीराव चव्हाण यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. २३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजेपूर्वी कोणीतरी अज्ञात चोरट्याने रुग्णालयाच्या आवारात प्रवेश केला. चोरट्याने अतिदक्षता विभागातील १५ ए.सी.साठी लागणारे अंदाजे ९० फूट कॉपर वायर आणि पाईप तोडून चोरून नेले. या चोरी गेलेल्या मालाची किंमत सुमारे १८,००० रुपये आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा शोध घेत आहेत.