Breaking
Updated: एप्रिल 25, 2026
गव्हाचे भुसकट पेटवल्याने ३० गुंठे ऊस आणि ठिबक जळून खाक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील पोखरी येथे आपल्या शेतातील गव्हाचे भुसकट पेटवल्यामुळे शेजारील शेतकऱ्याच्या ३० गुंठे ऊस पिकाचे आणि ठिबक सिंचन संचाचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता सातखंडी शिवारात घडली.
फिर्यादी केसरबाई नागनाथ निकम (वय ५५ वर्ष, रा. पोखरी) यांचे सातखंडी शिवारात शेत आहे. त्यांच्या शेजारील शेतकरी न्यानोबा नामदेव निकम आणि उत्तरेश्वर न्यानोबा निकम यांनी आपल्या शेतातील गव्हाचे भुसकट पेटवले होते. या आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे केसरबाई निकम यांच्या शेतातील ३० गुंठे ऊस आणि ठिबक संच जळून खाक झाला. यामध्ये अंदाजे ६०,००० रुपयांचे नुकसान झाले असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार घोळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.