शेजाऱ्यावर विश्वास ठेवून राहणाऱ्या एका कुटुंबाला मोठा फटका बसला असून, शेजाऱ्यानेच खिडकीतून घरात घुसून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड चोरल्याची घटना गवारी गावात उघडकीस आली आहे. रवींद्र छंदर कदम यांच्या घरातील निळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये ठेवलेले पाचशे रुपयांच्या तीनशे नोटांचे बंडल त्यांच्याच घराशेजारी राहणाऱ्या ऋषीकेश सखाराम लोमटे याने चोरून नेले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास घरात कोणी नसताना या आरोपीने संधी साधली आणि डल्ला मारला. आपल्याच हक्काच्या शेजाऱ्याने एवढी मोठी चोरी केल्याने कदम कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात आता दिवसाढवळ्या होणाऱ्या घरफोडीच्या या धाडसी घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे.













प्रतिक्रिया (०)
अद्याप प्रतिक्रिया नाहीत. पहिली प्रतिक्रिया तुम्हीच द्या!