Breaking

महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ

Updated: June 13, 2025

By Vivek Sindhu

महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

एकाविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा
केज – एक २२ वर्षीय विवाहित महिला ही आपल्या मुलासह झोपली असता एक जणाने घरात घुसून बेडवर झोपला. महिला ही झोपेतून जागी होताच त्याने हाताला वाईट हेतूने धरून विनयभंग केला. महिलेने आरडाओरडा केल्याने तिचे नातेवाईक मदतीला धावून आले असता त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची केज तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय महिलेचा पती हा चार दिवसांपूर्वी मजुरीसाठी बाहेरगावी गेला होता. ११ जून रोजी रात्री १०.३० वाजता ही महिला आपल्या लहान मुलाला घेऊन पत्र्याच्या राहत्या घरात दरवाजा ढकलून झोपली होती. महिलेचा पती घरी नसल्याची संधी बालु शिवाजी चिंचकर ( रा. येवता ता. केज) याने घरात घुसून महिला झोपलेल्या बेडवर जाऊन झोपला. महिलेच्या हाताला धक्का लागताच महिला ही झोपेतून जागी झाली.तिला बालु चिंचकर झोपलेला दिसून आला. त्याला पाहून ती बेडवरून उठत असताना त्याने महिलेच्या हाताला वाईट हेतूने धरत विनयभंग केला. त्यानंतर घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करताच शेजारी असलेले तिचे नातेवाईक जागे होऊन मदतीला धावून आले. त्यांना बालु चिंचकर याने जातीवाचक शिवीगाळ केली. अशी तक्रार महिलेने दिल्यावरून बालु शिवाजी चिंचकरविरुद्ध केज पोलिसात विनयभंग, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.