Breaking

लहान मुले,वृद्ध साथीच्या आजाराने त्रस्त, वातावरणातील बदलाचा परिणाम

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

लहान मुले,वृद्ध साथीच्या आजाराने त्रस्त, वातावरणातील बदलाचा परिणाम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई शहरात वातावरणातील बदलामुळे लहान मुले, वृद्ध आदींना सर्दी,ताप, खोकला डेंग्यु सदृश्य आजारात वाढ होताना दिसत आहे.
शहराच्या विविध भागातील लहान मुले, वृद्ध माणसे यांना विविध आजाराची लागण होत असून त्यांच्या रक्ताची चाचणी केली असता त्यांना डेंगू सदृश्य व्हायरल फिवर आजार सांगितल्या जात आहे वृद्धासह तरुण मुले,लहान बालके यांचाही मोठ्या समावेश प्रमाणात समावेश आहे. स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात थंडीताप,पेशी कमी, जास्त होणे व तत्सम आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.
सध्याची स्थिती लक्षात घेता अधून-मधून पडणारा पाऊस, वातावरणातील बदल, पावसामुळे येणारे दूषित पाणी, उघड्यावरील पदार्थांचे सेवन या सर्व बाबींचा परिणाम या सर्वआजारात आहे. असे जरी असले तरी सर्दी,ताप,खोकला,मलेरिया व श्वसन विकार या आजाराचेही रुग्ण आढळून आहेत.
सर्वच वयोगटातील नागरिकांना साथीच्या आजाराने घेरले आहे झालेल्या आजारासाठीचे तात्काळ उपचार घेत आहेत.उघड्यावरील पदार्थांचे सेवन,अधून मधून पडणारा पाऊस, वातावरणातील होणारा अचानक बदल यामुळेच डेंग्यु व इतर आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे विशेष म्हणजे शहराच्या जुन्या भागात रिपरिप पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल होते त्यामुळे यातून अनेक प्रकारच्या डासांची निर्मिती होत असून त्यामुळेच साथीच्या आजारांची लागण वाढली आहे अनेक रुग्ण उपचारार्थ दाखल होत आहेत. शिवाय बसस्थानक,मंदिरे आणि गर्दीची ठिकाणे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते त्यामुळे तिथेही आजाराची लागण होत आहे.


Related Posts :

Categories

Recent Posts