Breaking
Updated: मे 2, 2026
अल्पवयीन मुलीचे अपहरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज:- आई सोबत घरासमोर झोपलेल्या मुलीचे तिच्या आजोळच्या तरुणाने एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.
दि. २६ एप्रिल रोजी रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे वडील नातेवाईकांच्या लग्नाला बाहेरगावी गेले असताना, रात्री आई, आजी आणि भावा सोबत घरा समोर झोपलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या आजोळी राहत असलेल्या एका तरुणाने पांढऱ्या रंगाच्या कार मधून तिचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले.
त्या अल्पवयीन मुलीला तिच्या आजोळचा तरुण मोबाईल वरून संपर्क साधत होता आणि ती त्याला आवडत असल्याचे म्हणत असे. ही माहिती अल्पवयीन मुलीने तिच्या आईला दिली होती.
या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारी वरून अमोल मिनीनाथ गिराम याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. २५२/२०२६ भा. न्या. सं. १३७(२) प्रमाणे अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपहरण करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचे वय १७ वर्षे, ५ महिने, ११ दिवस आहे. तिचा रंग-गोरा, उंची अंदाजे ४ फुट ६ इंच, अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस व गुलाबी रंगाची पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाची ओढणी, पायात गुलाबी रंगाची सायंडल, केस काळे व लांब, ती मराठी भाषा मराठी बोलते. अशा वर्णनाची मुलगी कुणाला आढळून आल्यास किंवा तिची माहिती मिळाल्यास तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.