Breaking

महावितरणच्या कर्मचाऱ्यास कंत्राटदाराकडुन मारहाण

Updated: जून 25, 2025

By Vivek Sindhu

महावितरणच्या कर्मचाऱ्यास कंत्राटदाराकडुन मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पाटोदा – महावितरच्या कंत्राटदाराने कार्यालयात घुसून मजुरीचे पैसे देण्याच्या कारणावरुन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. इतकेच नाही तर कार्यालयातील संगणक,खुर्च्यासह इतर साहित्याची तोडफोड देखील केली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली असून या विरोधात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.२४)रोजी आंदोलन केले आहे.

वीज वितरण कंपनीच्या पाटोदा कार्यालयाने विद्युत वाहिनीस अडसर ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम येथील गुलशन एजन्सीला दिले होते. गारमाथा परिसरात काम करण्यासाठी मजुरांची अडचण आल्याने तंत्रज्ञ किरण बाळू नाईकनवरे यांनी त्यांच्या ओळखीचे मजूर गुलशन एजन्सीला दिले.

काम झाल्यानंतर मजूरांनी नाईकनवरे यांच्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर नाईकनवरे यांनी एजन्सी चालकाकडे पैसे देण्यास सांगितले. यावरून वाद निर्माण झाला.सोमवार (दि.२३)रोजी एजन्सी चालक यास फोनवरून ऑफिसला या आणि मजुरांचा हिशोब मिटवा असा निरोप दिला.

मजुरीचे पैसे देण्याच्या कारणावरुन किरण नाईकनवरे व सतीश सोमनाथ गोरे यांना मारहाण केली.शिवाय कार्यालयातील फर्निचर,संगणक व इतर साहित्य फोडले.हा प्रकार अंगलट येत असल्याचे लक्षात येताच पोलिसात तक्रार केली.वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती कळवली त्यांच्या आदेशानुसार काही कर्मचारी पोलिसात तक्रार द्यायला गेले परत येत असताना राज मोहम्मद चौकात पुन्हा कर्मचाऱ्यावर हल्ला केला.

यानंतर वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज मंगळवार (दि.२४) रोजी चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केले.दरम्यान मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली.चौकातील सर्व रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.जखमी तंत्रज्ञ यास उपचारासाठी बीडच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.


Categories

Recent Posts