Breaking
Updated: सप्टेंबर 20, 2025
एएसपी चेतना तिडके यांच्या निदर्शनास आला प्रकार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव : छोट्याशा कारणावरून गावातील तरुणावर दगडफेक करून हल्ला झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मनुरवस्ती येथे घडली.
शंकर अभिमान पोपळे (वय २८, व्यवसाय मजुरी, रा. मनुरवस्ती, ता. माजलगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की, सचिन रानोजी कांबळे (रा. मनुरवस्ती, ता. माजलगाव) याने “मला मोटारसायकलवर पात्रुड कंदुरी कार्यक्रमाला का नेले नाहीस?” या कारणावरून संताप व्यक्त केला. यानंतर त्याने हातातील दगड पोपळे यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सफौ बळवंते करीत आहेत.