Breaking

हातभट्टी विकणाऱ्यावर एमपीडीए कारवाई

Updated: June 7, 2025

By Vivek Sindhu

हातभट्टी विकणाऱ्यावर एमपीडीए कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

परळी – तालुक्यातील धारावती तांडा येथील हातभट्टी विक्री करणाऱ्या इसमाविरोधात एमपीडीए काय‌द्याअंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याची रवानगी हर्मुलच्या कारागृहामध्ये करण्यात आली आहे.

रघुनाथ शिवाजी राठोड (वय ६०) रा.धारावती तांडा ता. परळी याच्या विरोधात एमपीडीए कायद्या अंतर्गत स्थानबद्द करण्याबाबचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत जिल्हा न्याय दंडाधिकारी यांना सादर करण्यात आला होता. त्यानुसार कारवाई करण्यात आली असून राठोड याची रवानगी हर्मुलच्या जेलमध्ये करण्यात आली आहे.