Breaking

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

Updated: June 18, 2025

By Vivek Sindhu

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

WhatsApp Group

Join Now

केज – तहसिल कार्यालय, केज व महसूल विभागाच्या वतीने बनसारोळा (ता. केज) येथे बुधवारी (दि. १८) महाराष्ट्र शासनाचा उपक्रम “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित केले होते. या शिबिराचे उदघाटन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते झाले.
शिबिरास अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे – जिरंगे, उपविभागीय अधिकारी दिपक वजाळे, तहसिलदार राकेश गिड्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी “जनता दरबार” आयोजित केला. दरबारात उपस्थित नागरिकांनी त्यांच्या समस्या व प्रश्न मांडले. तर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करून लेखी तक्रारी स्वीकारल्या. त्यावर तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले.
या सर्व विभाग प्रमुखांनी शासकीय योजनांची ओळख करून देत त्याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासंदर्भात माहिती दिली. प्रत्येक विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित विविध योजनांचे विवरित विवरण दिले, ज्यामुळे उपस्थित नागरिकांना त्या योजनांचा फायदा मिळवण्याच्या दिशेने मार्गदर्शन प्राप्त झाले.
कार्यक्रमाला गटविकास अधिकारी समृद्धी तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडसकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी शोभा लटपटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक गवळी, नायब तहसीलदार (महसूल) अशोक भंडारे, निवासी नायब तहसीलदार आशा वाघ, पुरवठा निरीक्षण अधिकारी सुजाता रामटेके – मेश्राम, विद्युत महावितरणचे सहाय्यक अभियंता भूमिअभिलेखचे उपअधिक्षक, सामाजीक वनीकरण अधिकारी उपविभाग, पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, वाहतुक नियंत्रक (राज्य परिवहन महामंडळ) हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामुळे केज तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. तर भविष्यात त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.