Breaking

हायवेवर थांबलेल्या बसमधून १ लाख रुपयांचा ऐवज चोरी

Updated: ऑगस्ट 20, 2025

By Vivek Sindhu

1080741 crime

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मांजरसुंबा गावच्या पुढे चौसाळा बायपासजवळ धोत्रा गावाजवळ हायवेवर थांबलेल्या बसमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल १ लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली. या प्रकरणी नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महीपती हरीभाऊ तांदळे (रा. तांदळेचीवाडी, जि. बीड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १९ ऑगस्ट रोजी पहाटे अडीचच्या सुमारास एम. एच. ०३ डीव्ही ३६८२ ही बस चौसाळा बायपासलगत हायवेवर उभी होती. समोरच एम. एच. २० ईजी ८३०० ही गाडी बंद पडल्याने बसचा चालक व कंडक्टर त्यांना मदत करत होते. त्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बसच्या लगेज बॉक्समधील दोन प्रवाशांचे सामान लंपास केले.

चोरट्यांनी महिपती तांदळे व रजनी कुलकर्णी यांच्या हिरव्या रंगाच्या ट्रॉली बॅगमधून १.२ तोळ्याचे सोन्याचे अठोर (किंमत ७० हजार), रोख ४ हजार, कपडे, हार्ड डिस्क, रिसर्च बुक, गॉगल, परफ्युम, हेअर ड्रायर अशा वस्तू मिळून ७७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच रजनी राजेंद्र कुलकर्णी यांच्या प्लॅस्टिक पोत्यातून इलेक्ट्रिक सामान (किंमत २३ हजार) चोरीस गेले.

या प्रकरणी एकूण १ लाख रुपयांचा माल चोरीला गेला असून नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पुंडे करीत आहेत.


Categories

Recent Posts