Breaking

शेतातील वादातून लाकडी काठीने मारहाण

Updated: मार्च 14, 2026

By Vivek Sindhu

देवगाव येथे शेतकऱ्याचे डोके फोडले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: शेतात जळालेली मोगरी (चारा) आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याची घटना मुजरेगाव शिवारात घडली आहे. या प्रकरणी प्रभाकर भोसले यांच्या तक्रारीवरून गोरख गुजर, गिलाबाई गुजर, भीमराव गुजर आणि दत्ता वाळकर यांच्याविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी संतोष शिवाजी गुजर (वय ३८, रा. जारवाडी) हे ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना आरोपींनी त्यांना वाटेत अडवले. “तू इकडून ट्रॅक्टर का नेतोस?” असे म्हणत आरोपींनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाकडी काठीने त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच भविष्यात जिवे मारण्याची धमकीही दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार परजणे करीत आहेत.


Categories

Recent Posts