Breaking
Updated: सप्टेंबर 9, 2025
सालगडी शेतमालकाच्या घरातून ४० हजार रुपये घेऊन फरार
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील सातपुते गल्लीतील वीर गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक होऊन दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास गुरुवारपेठेत घडली. लक्ष्मण रंगनाथ नांदगावकर (वय ३८, रा. सातपुते गल्ली, अंबाजोगाई) यांनी याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी व मंडळातील कार्यकर्ते गणेश विसर्जन मिरवणूक घेऊन जात असताना रोहित जिरे (रा. पटाईत गल्ली) दारूच्या नशेत नाचत धिंगाणा घालू लागला. त्याला समजावून मिरवणुकीतून बाहेर काढले असता त्याने शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर गुरुवारपेठेत रोहित जिरे दत्तप्रसाद जेधे (वय २२, रा. पटाईत गल्ली), अविनाथ हेडे (वय २४, रा. रविवारपेठ) आणि बबलु सुदर्शन पटाईत (वय २२, रा. रविवारपेठ) यांच्यासह आला. या चौघांनी रस्त्यालगतच्या विटा व दगड उचलून मिरवणुकीवर फेकले. यामध्ये लक्ष्मण नांदगावकर आणि गणेश काशिनाथ सातपुते हे जखमी झाले. आजुबाजूच्या नागरिकांनी मध्यस्थी केली असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात रोहित जिरे, दत्तप्रसाद जेधे, अविनाथ हेडे आणि बबलु पटाईत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.