Breaking
Updated: मे 28, 2026
केजमध्ये मटका घेणाऱ्यास पकडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – अज्ञात चोरट्यांनी नांदूरघाट (ता. केज) येथील पाच शेतकऱ्यांचे विद्युत मोटारीसह केबल वायर असा ७५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
केज तालुक्यातील नांदूरघाट येथील शेतकरी शंकर भानुदास जाधव यांच्या शेतातील विहिरीतील २४ हजार शंभर रुपये किंमतीची पाणबुडी मोटार व पाच हजार रुपयांचे १०० फूट केबल वायर घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेजारी शेतकरी सुनंदा दत्तु जाधव यांच्या विहीरीवरील १८ हजार पाचशे रुपयांची पानबुडी मोटर व सहा हजार रुपयांचे केबल वायर कट करून घेतले. दत्तात्रय बळीराम जुगदर यांचे विहिरीवरील पाच हजार रुपयांचे १०० फूट केबल वायर, गणेश महादेव जाधव यांचे बोअरमधील ७ हजार २५० रुपयांचे १४५ फूट केबल वायर, रामेश्वर छंदर जाधव यांचे बोरमधील दहा हजार रुपयांचे २०० फूट केबल वायर लंपास केल्याची घटना २१ मे रोजी रात्री ७ ते ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. शंकर जाधव यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा झाला आहे. जमादार उमेश आघाव हे तपास करीत आहेत. दरम्यान, एकाच रात्री पाच शेतकऱ्यांचे विद्युत मोटारीसह केबल वायर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.