Breaking
Updated: मे 25, 2026
चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel—
केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव आणि आडस कृषी मंडळात झालेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीची मदत देण्याची मागणी अजित पवार पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते रमेशराव आडसकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
दि. २३ मी रोजी केज तालुक्यातील युसुफ वडगाव व आडस मंडळात झालेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई व मदत मिळण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजितावर गटाचे नेते रमेशराव आडसकर यांनी तहसीलदार अशोक भंडारे यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.
माजी उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अशोक भंडारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, युसुफवडगाव व आडस कृषी मंडळात दि. २३ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, वीज व्यवस्था तसेच नागरिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी केज तहसीलदार अशोक भंडारे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच मौजे सोनिजवळा येथील शेतकरी दिगांबर ससाणे यांचा अंगावर वीज कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
वादळामुळे अनेक गावांमध्ये वीज पोल व तारा धोकादायक अवस्थेत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित दुरुस्ती करून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात. अशी सूचनाही निवेदनात करण्यात आली.
ऋषीकेश आडसकर यांच्या सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे, युवा नेते रणजितदादा आडसकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर पाटील, युवक अध्यक्ष शिवदास थळकरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गोविंदराव ससाणे, बाजार समितीचे संचालक तथा सरपंच कैलास पाटील, सुशिल अंधारे, कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.