Breaking
Updated: मे 28, 2026
केजमध्ये मटका घेणाऱ्यास पकडले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज पोलीस ठाण्याचे फौजदार लक्ष्मण किर्तने, जमादार अनिता दगडखैर, पोलीस नाईक त्रिंबक सोपणे, विष्णू नागरगोजे यांच्या पथकाने २७ मे रोजी दुपारी १.५० वाजता शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या अनिल भोजनालयाच्या पाठीमागे रस्त्यावर छापा मारून सुनिल रमेश हतागळे (रा. समर्थ नगर, केज) यास कल्याण मटका नावाचा जुगार लोकांकडुन पैसे घेऊन आकड्यावर पैसे लावून खेळत व खेळवित असताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून आकड्याच्या चिठ्या, नगदी रक्कम व मोबाईल असा १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याने चाँद शेख (रा. लोंढे गल्ली, केज) यास दहा टक्के कमीशनवर धंदा देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी सुनिल हतागळे, चाँद शेख या दोघां विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.