Breaking
Updated: मे 28, 2026
आगीमध्ये भावाच्या मुलांना वाचवताना होरपळलेल्या 55 वर्षीय बहिणीचा मृत्यू:बर्दापूर येथे एकाच कुटुंबातील चौघे अजूनही उपचाराखाली, 15 मे रोजी घडली होती घटना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelतालुक्यातील बर्दापूर येथे १५ मे रोजी रात्रीच्या सुमारास एका घराला लागलेल्या भीषण आगीत होरपळलेल्या ५५ वर्षीय महिलेचा अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आपल्या भावाच्या घरातील निष्पाप लहान मुलांना आगीच्या भक्ष्यस्थानी पडण्यापासून वाचवताना ही महिला गंभीर जखमी झाली होती. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील इतर चार जण अजूनही गंभीर भाजलेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बर्दापूर येथील रहिवासी शेख शेरू शेख हुजूर यांच्या घराला १५ मे रोजी रात्री अचानक भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा आणि धूर निघत असल्याचे पाहून शेख शेरू यांची बहीण आणि भाचा तत्काळ भावाच्या घराकडे धावले. घरात लहान मुले अडकल्याचे समजताच, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या प्रक्रियेत घरातील सदस्यांसह मदत करायला गेलेली बहीण आणि भाचा आगीत गंभीररीत्या होरपळले. या भीषण आगीत शेख शेरू यांच्यासह कुटुंबातील पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, लहान मुलांना वाचवताना ६० टक्के भाजलेल्या शेख शेरू यांच्या सख्ख्या बहीण रब्बानी शेख (५५, रा. बर्दापूर) यांची प्राणज्योत उपचारादरम्यान विझली.
यांच्यावर सध्या उपचाार सुरु शेख शेरू शेख हुजूर (३०), तनवीर शेरू शेख (१७), तोफिक शेरू शेख (१४), अजीम रफिक शेख(३२) या सर्व जखमींची प्रकृती अजूनही गंभीर असून, रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर शर्थीचे उपचार करत आहेत.