Breaking
Updated: मे 26, 2026
लव्हुरी येथे जनगणनेच्या प्रगणकासह आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यात जनगणनेचे काम करण्यासाठी गेलेल्या प्रगणक शिक्षकासह गावातील आठ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेत जखमी केले. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.
२०२७ चे जनगणनेचे काम शिक्षका मार्फत सुरू आहे. केज तालुक्यातील लव्हुरी येथील श्री. बडेबाबा विद्यामंदिर या शाळेचे सहशिक्षक मंगेश गोविंदराव सोनके (प्रगणक क्र. ०१७०) हे सोमवारी सकाळी गावातच जनगणनेचे काम करण्यासाठी गेले होते. अचानक धावत आलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने सहशिक्षक मंगेश सोनके यांना चावा घेऊन जखमी केले. तर याच पिसाळलेल्या कुत्र्याने गावातील शिवाजी चाळक, अयोध्या चाळक, अमोल चाळक, गोवर्धन चाळक, संतोष चाळक, राजेभाऊ चाळक, मुरलीधर चाळक, सचिन चाळक या आठ जणांना चावा घेऊन जखमी केले. या जखमी शिक्षकांसह आठ जणांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, तालुका प्रशासनाने या प्रकारची दखल घेऊन प्रगणकावर अशा प्रकारे कुत्र्याचे हल्ले होऊ शकतात, म्हणून स्थानिक पातळीवर मदतीसाठी किमान एक व्यक्ती द्यावा. अशी मागणी प्रगणकांनी केली आहे.