Breaking
Updated: मे 28, 2026
दोघा विरुद्ध गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करण्यासाठी केज येथे शेतात डांबून ठेवलेल्या आठ प्राण्यांची सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने सुटका केली आहे. या प्रकरणी दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दि. २७ मे रोजी रोजी 11.00 वा सुमारास सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम (आय पी एस) यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, केज येथे मौजे टाकळी ता. केज जि. बीडकडे जाणारे रोडवर केज जि.बीड शिवारातील सौंदडीचे नावाने ओळखल्या जात असलेल्या शेतात शेत मालक मुजफर हमीयोद्दीन खतीब व मुन्ताजोद्दीन खतीब यांचे मालकीचे शेतातील आंब्याचे, जांभळीचे झाडाखाली मोकळ्या जागेत दोन इसमांनी गाय, बैल.व गोऱ्हा या गोवंशिय जातीच्या जनावरांची कत्तल करण्यासाठी जनावरांना डांबून ठेवलेले आहे.
माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांनी त्यांचे पथकाला कारवाई करून गोवंशीय प्राण्यांची त्यांच्या तावडीतून सुटका करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच त्यांच्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलिस हवालदार बालासाहेब डापकर, पोलिस हवालदार धोंडीराम मोरे, पोलिस हवालदार राजु वंजारे, पोलिस हवालदार विशाल क्षीरसागर, पोलिस हवालदार विकास चोपणे यांनी टाकळी रस्त्यावर असलेल्या सौंदडीच्या शेतात जाऊन धडक कारवाई केली. त्यावेळी पोलिस पथकाला पाहून भागवत बारीकराव पारवे (रा. केज) आणि नौशाद उस्मान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, केज) यांनी गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने बैल, गोरे व गाय असे १ लाख ६३ हजार रु. किमतीचे एकुण आठ प्राणी डांबून ठेवले असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच भागवत बारीकराव पारवे आणि नौशाद उस्मान कुरेशी हे दोघे पळून गेले.
या प्रकरणी पोलीस हवालदार राजू वंजारे यांच्या फिर्यादी वरून भागवत बारीकराव पारवे आणि नौशाद उस्मान कुरेशी यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत. अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके मॅडम, सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमीरोद्दीन इनामदार, पोलिस हवालदार बालासाहेब डापकर, पोलिस हवालदार धोंडीराम मोरे, पोलिस हवालदार राजु वंजारे, पोलिस हवालदार विशाल क्षीरसागर, पोलिस हवालदार विकास चोपणे यांनी केली.