Breaking
Updated: मे 28, 2026
आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel
केज:- उन्हाळी सुट्टीत आजोळी मामाकडे आलेल्या एका आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या चुलत मनाच्या म्हणजे नात्याने चुलत मामेभाऊ आलेल्या २५ वर्षीय युवकाने घराचा दरवाजा लावून घेत तिचे तोंड आणि हात रुमालाने बांधून बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची नात्याला काळीमा फासणारी घटना केज तालुक्यातील एका गावात घडली आहे.
दि. २२ मी रोजी माजलगाव तालुक्यातील एका गावात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली तेरा वर्षाची मुलगी ही तिच्या आत्या सोबत केज तालुक्यातील दैठणा येथे तिच्या मामाच्या गावी आजोळी आली होती. दि २५ रोजी ती घरात एकटीच झोपली होती. त्या दरम्यान दुपारी ३:०० वाजता तिच्या चुलत मामाचा २५ वर्ष वयाचा मुलगा नात्याने तिचा चुलत मामेभाऊ घरी आला. घरी आल्या नंतर त्याने आजीची चौकशी केली. तेव्हा ती अल्पवयीन मुलगी त्याला म्हणाली की, तिची आज्जी सरपण आणण्यासाठी शेतात गेली आहे. तरीही तो घरात आला आणि घरात कोणी नसल्याने त्य मुलीने त्याला घरात येण्यास विरोध केला तरी तो घरात घुसला. घरात येताच त्याने आतून दरवाजा बंद करून दाराची कडी लावून घेतली. दरवाजा बंद करताच ती मुलगी ओरडू लागल्याने त्याने तिचे तोंड रूमालाने बांधले. तिने दरवाजाची कडी उघडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पाठीवर चापट मारून तिचे दोन्ही हात दोरीने बांधले. त्या नंतर त्याचे स्वतःचे व अल्पवयीन मुलीच्या अंगावरील सर्व कपडे काढून बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून तिचा चुलत मामेभाऊ याच्या विरुद्ध गु र नं ३२३/२०२६ भा न्या सं ६५(१), ३३३, ११५(२), ३५१(२) यासह पोक्सोचे कलम ४ व ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर हे तपास करीत आहेत.
आरोपी घरातच लपून बसला होता
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या नंतर सरपण आणण्यासाठी शेतात गेलेली मुलीची आजी सरपण घेऊन परत घरी आल्याची चाहूल लागताच त्याने तिचे दोरीने बांधलेले हात सोडले आणि कुणाला काही सांगू नको अन्यथा जिवे मारण्याची धमकी देवून अंगावर गोधडी घेऊ न घरातच लपून बसला होता.
आजी घरात येताच आरोपी धक्का मारून पळाला :- पीडित मुलीने तिच्या तोंडाला बांधलेला रुमाल काढून दरवाजाची कडी काढून दरवाजा उघडला. तिने घाबरून आजीला आवाज दिला. आजी घरात येताच गोधडी पांघरून लपलेला आरोपी आजीला धक्का देऊन पळून गेला.
एक दिवसा नंतर गुन्हा दाखल :- पीडित मुलीच्या आजीने ही माहिती तिचे मामा आणि आई वडिलांना दिल्या नंतर दि. २६ रोजी ते सर्नांवजण केज पोलिस ठाण्यात आले. त्या नंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून दि. २७ मे रोजी रात्री उशिरा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाला.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात :- घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी रात्री त्याच्या गावात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणीसाठी अल्पवयीन मुलीला दहा तास ताटकळत ठेवल्याचा आरोप :- लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्या नंतर महिला पोलिस पीडित मुलीला घेऊन उपजिल्हा रुग्णालय केज येथे गेल्या नंतर तत्काळ तिची वैद्यकीय तपासणी करण्या ऐवजी स्त्रीरोग तज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकारी या ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशन करीत असल्याचे सांगून त्या अल्पवयीन मुलीला तब्बल दहा तास ताटकळत ठेवल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. त्या नंतर प्रसिद्धी माध्यमात वृत्त प्रकाशित झाल्या नंतर दि. २८ मे रोजी जिल्हा शल्य चिकित्सक सोळंके यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन चौकशी केली. मात्र चौकशीचा अहवाल हाती लागलेला नाही.
आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी :- पोलिसांनी आरोपीला न्यायालयात.हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २९ मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.